Dainik Maval News : डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत बेबड ओहळ ग्रामपंचायत येथे ‘कृषी मेळावा व चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
- सदर कार्यक्रमास बेबड ओहोळ, उर्से, धामणे, शिवणे, पिंपळ खुंटे, गहुंगे, शिरगाव या गांवामधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीनचंद्र बोराडे, उपकृषी अधिकारी – वडगाव, विकास गोसावी, उपकृषी अधिकारी – काळे कॉलनी, अश्विनी खंडागळे, सहाय्यक कृषी अधिकारी – बेबड ओहोळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना नवीन बोराडे यांनी शेतकऱ्यांना खरीप पिके उत्पादकता वाढविण्याच्या विविध उपाययोजना, विकास गोसावी यांनी कृषी व कृषी व्यवसायाशी निगडित शासकीय योजना आणि अश्विनी खंडागळे यांनी भाताची चारसुत्री पद्धतीने लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. एम. डी. जगताप यांनी कृषी पर्यटनावर आणि डॉ. एस. एन. पाटील यांनी कृषी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले व त्यावर उत्तम उपायही सुचविण्यात आले. शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. टी. बी. देवकाटे व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील प्रभारी प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप,उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील आणि कृषी व्यवसाय तज्ञ ए. एम. कदम, एस. आर. बेनके, व्ही. बी. घोलप, एच. एस. चिरमुरे, बी. के. चव्हाण, व्ही. डी. दरंदले व कार्यालयीन अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अमृता चांडोले आणि कु. स्नेहा राऊत यांनी केले. आयोजन कृषीकन्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. उपस्थित मान्यवरांचे व शेतकरी बांधवांचे बेबड ओहोळ गावच्या सरपंच तेजल घारे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा