व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यात सर्व न्यायालयांमध्ये 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Lok-Adalat

File Image


राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर लोक अदालतमध्ये प्रलंबित असलेली मोटार वाहन, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज वितरण कंपनीची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 320 अनुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाऊंन्सची प्रकरणे अशी पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली एकूण 44 हजार 616 प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. ( Organized National Lok Adalat on April 30 in all courts in Pune district )

बँक, वीज कंपनी, महानगरपालिका व ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीची तसेच विविध वित्तीय संस्थाची व मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी अशी एकूण 1 लाख 26 हजार 597 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आलेली आहेत.

नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयामध्ये तडजोडीकरीता ठेवावयाची असल्यास त्यांनी संबंधित न्यायालयामध्ये किंवा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे तसेच तालुका विधि सेवा समिती येथे संपर्क साधून आपली प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवावीत. लोकन्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरीता पक्षकार त्यांच्या वकिलांशी संपर्क करु शकतात. तसेच त्यांची मदत देखील घेवू शकतात.

लोकन्यायालयामध्ये प्रकरणे मिटल्यास कोर्ट फी नियमाप्रमाणे परत मिळू शकते आणि प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोकन्यायालयाच्या निकालावर अपील नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटुता निर्माण होत नाही. वेळ व पैसा दोघांचीही बचत होते. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल कश्यप यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
– सॅल्यूट!! वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांचा पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

तळेगावातील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा जाधववाडी धरणात बुडून मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
drowning

तळेगावातील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा जाधववाडी धरणात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.