Dainik Maval News : राष्ट्रीय संत आचार्य सम्राट १००८ गुरुदेव पुज्य श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त वडगांव मावळ (पुणे) च्या जैन श्री संघाने शुक्रवार १४ फेब्रुवारी, रोजी सकाळी वडगाव मावळ (पुणे) येथील रहिवाशी शिवम संदीप बाफना यांच्या भव्य जैन भगवती दीक्षा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय संत आचार्य सम्राट १००८ पुज्य गुरुदेव श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या दिव्य कृपेने व आचार्य सम्राट ध्यान योगी डॉ. श्री शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या परवानगीने महाराष्ट्राचे श्रमणसंघीय प्रवर्तक श्री कुंदनऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने युवा हृदय सम्राट, आगम रत्नाकर, श्रुत महोदधी, श्रमण संघीय युवाचार्य पुज्य श्री महेंद्रऋषीजी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात मुमुक्षु शिवम बाफना यांचा जैन भगवती दिक्षा महोत्सवाचे (संयम महोत्सव)आयोजन करण्यात आले आहे.
- मुमुक्षु शिवम बाफना यांचा जन्म २४ जुलै २००० रोजी पुण्यात झाला. आईचे नाव अनिता आणि वडिलांचे नाव संदीप बाफना आहे. त्यांनी डी. फार्मसी आणि निसर्गोपचार आणि योग विज्ञानात डिप्लोमा केला आहे. त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणात साधु प्रतिक्रमण, दशवैकालिक सूत्रांचे १४अध्याय, उत्तराध्यायन सूत्राचे(काही अध्याय), २ अध्याय गतागती चेअभ्यास यांचा समावेश आहे. ही माहिती ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे दिल्ली कार्यकारिणी सदस्य श्री संजय कोटेचा यांनी दिली
१४ फेब्रुवारी रोजी, श्रमण संघाचे युवाचार्य पुज्य श्री महेंद्रऋषीजी म.सा. यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली वडगांव मावळ (पुणे) येथे जैन भगवती दिक्षा महोत्सवाचे व धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ