जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. किशोर आवारे यांच्या जन्मदिनानिमित्त तळेगाव शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराच्या याबाबत माहिती देण्यात आली. गोरगरिबांचे कैवारी, देशभक्त अशी किशोर आवारे यांची ख्याती होती. समाजातील दिनदुबळ्या शोषितांना मदत करण्यामध्ये ते कायमच अग्रेसर होते. त्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दिनांक 19 नोवहेंबर) रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ यांची प्रवचन रुपी सेवा होणार आहे. इंद्रायणी कॉलनी, तळेगाव स्टेशन इथे रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रवचन आणि प्रवचनानंतर रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आजोयन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘सफर गड दुर्गांची’, वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर
– राजपुरी – नवलाख उंब्रे मार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल
– शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा योजनेतील अग्रीम भरपाईचे वाटप सुरु, आतापर्यंत ‘इतके’ कोटी वाटले, पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती