तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) झालेल्या रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झाला. मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. रामदास गणपत शिंदे असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, सुरेश गबळू तळावडे हे गंभीर जखमी झालेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राहुल गणपत शिंदे (रा. आंबी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे बंधू रामदास शिंदे आणि सुरेश तळावडे हे राजपुरीहून नवलाख उंब्रेच्या दिशेने जात होते. त्यावेळी बधलवाडी चौकात एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले, पैकी रामदास गणपत कदम यांचा यात मृत्यू झाला. ( speeding container collided with two wheeler one died on spot case registered in Talegaon MIDC Police )
फिर्यादीवरुन तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर (क्रमांक एम.एच. 46 बी.यू. 39 68) चालकावर भादवी 304 (अ), 279, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक फरार असून त्याचा सध्या शोध घेतला जात आहे. स. पोलिस फौजदार शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. भरधाव वेगाने अवजड वाहने चालवणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांमुळे आज पुन्हा एका सामान्य नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
अधिक वाचा –
– स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम
– लोणावळा शहरात ‘वॉटरब्लॉक’, शनिवारी दुपारपासून पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा संपूर्ण सुचना
– शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन : सोमाटणे फाटा इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रुग्णांना फळे वाटप