Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ व नाणे मावळ परिसरातील भात पिके आता दमदार आली आहेत. भाताच्या लोंब्या डोलू लागल्या असून अनेक ठिकाणी भात पीक कापणीला आले आहे. येत्या आठवडाभरात तयार झालेल्या भात पिकाच्या कापणीची सुरुवात होईल.
पुरेसा पाऊस आणि दमदार आलेले भात पीक यामुळे यंदा शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पिकाला गरज असताना वेळोवेळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पोषक वातावरण तयार होऊन खरीप भात पीक चांगले बहरले आहे. यामुळे यंदा भाताचे चांगले उत्पन्न होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या परतीच्या पावसाचे वातावरण असल्याने ही कापणी काही प्रमाणात लांबली आहे.
तालुक्यात यंदा जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांनी इंद्रायणी वाणाची लागवड केली आहे. सध्या जवळपास सर्वच ठिकाणचे भात पीक पोटरीवर आले असून काही ठिकाणी पिके थेट कापणीला आली आहेत. साधारणपणे दिवाळीच्या तोंडावर भात कापणीला सुरुवात होइल, अशी चिन्हे दिसत आहे. भात पिकाची कापणी, झोडपणी, मळणी असे अनेक टप्पे असतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade