Dainik Maval News : वन्यजीव रक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत ‘वन्यजीव रेस्क्यूअर मावळ’ आणि पुणे वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १० ऑगस्ट २०२५ रोजी सुशीला मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहेत.
या विशेष उपक्रमामध्ये भाग घेऊन नागरिकांनी वन्यजीव संरक्षण व निसर्ग संवर्धन यासोबतच सामाजिक भान जपत रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरण जागृतीसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेद्वारे लहानग्यांना निसर्गाबाबत कळकळ निर्माण व्हावी, असा उद्देश आहे.
रक्तदान शिबिराद्वारे समाजात आरोग्य जागृती व मदतीचा हात पुढे करण्याचा संदेश दिला जाणार आहे. “आरोग्यदायी समाज आणि हरित भविष्य” या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठिकाण : सुशीला मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे
दिनांक : १० ऑगस्ट २०२५
वेळ : सकाळी ९ वाजता पासून
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या