व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. कामाचा संपूर्ण आढावा घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Panvel Airport in Maval Lok Sabha constituency will be opened from September Information from MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथील लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी असणारा भारतातील हे पहिलेच विमानतळ असणार आहे. वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असलेले टर्मिनल एक सप्टेंबर 2025 पासून सुरु होईल. येथून आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्थरावर सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. कामाचा संपूर्ण आढावा घेतला. अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. अदानी एरपोर्ट विभागाच्या सीईओ मिनल नाईक, सिडको प्रोजक्ट मॅनेजर गीता पिल्ले यांनी विमानतळाच्या कामाचे सादरीकरण दिले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा प्रमुख अतुल भगत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब, तुकाराम सरख, सुनिल गोवारी, प्रसाद सोनवणे, शिवसेना उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख मंगेश राणवडे, शिवसेना महिला उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेधाताई दमडे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  • खासदार बारणे म्हणाले, पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या पनवेलमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. मेट्रो 1, मेट्रो 2, मेट्रो 3 यासह वॉटर टॅक्सी, स्थानिक लोकल ट्रेन सेवा आणि भविष्यातील मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यांची थेट कनेक्टिव्हिटी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत देखील थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. प्रदूषण रहित ‘ग्रीन एअरपोर्ट’ कन्सेप्ट राबविली जाणार आहे.1150 हेक्टर इतक्या मोठ्या परिसरात एअरपोर्टचा विस्तार होत आहे. विमानात इंधन भरण्याची अंडरग्राउंड पाईपलाईन तर्फे (ASF) प्रणाली कार्यन्वित केली जाणार आहे

सप्टेंबर 2025 पासून टर्मिनल वन सुरू होणार आहे. त्याची वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. 2029 पर्यंत टर्मिनल टू सह जवळजवळ 80 टक्के कामकाज पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. सन 2036 पर्यंत चार टर्मिनल्स, एक व्हीआयपी टर्मिनल, जनरल एव्हिएशन (खाजगी विमाने) देशातील सर्वात मोठे कार्गो डेपो असे संपूर्ण विमानतळ शंभर टक्के विकसित होणार आहे. 3.7 किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा रनवे असणार आहे. त्यावर मोठी कार्गो विमाने व एअरबस ए 380 सारख्या विमानांचे लँडिंग आणि उड्डाण शक्य होणार आहे. मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ जवळ दुप्पट प्रवासी व विमानांच्या दळणवळणाची क्षमता आहे.

विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सप्टेंबर 2025 रोजी आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्थरावर चालू होईल. सर्व वाहतूक व्यवस्थेला विमानसेवा जोडल्या जाणार आहेत. यामध्ये मेट्रो,भूमिगत रेल्वे,बुलेट ट्रेन या सेवेचा समावेश आहे. 2029 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने पूर्णपणे उड्डणे घेतील. देशातील महत्वाचे व मोठे विमानतळ म्हणून याकडे पाहिले जाते. विमानतळासाठी केंद्र सरकार, सिडको यांच्या माध्यमातून लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवनाधरण परिसरात 24 तासात 102 मि.मी. पाऊस, धरणात ‘इतका’ पाणीसाठा । Pavana Dam
– लोणावळा शहरात पावसाची जोरदार बॅटींग, 24 तासात तब्बल 171 मि.मी. पाऊस । Lonavala Rain Updates
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


Previous Post

पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून एकाला मारहाण; कातवी मावळ येथील प्रकार । Maval Crime

Next Post

कृषी निविष्ठा परवान्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांना अर्ज करण्यात आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmer producer companies and farmer groups urged to apply for agricultural input licenses

कृषी निविष्ठा परवान्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांना अर्ज करण्यात आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.