मावळ तालुक्यातील नायगाव येथे राहणाऱ्या बनताबाई पुताजी काजळे – चोपडे या 58व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे शिक्षण सोडल्यानंतर तब्बल 42 वर्षांनी बनताबाई यांनी परीक्षा दिली आणि त्या चांगल्या मार्कांनी उत्तीर्णही झाल्या. त्यांच्या या यशाचे सर्व मावळ तालुक्यातून कौतूक होत आहे. शिक्षणाची आवड असणारे कोणत्याही परीक्षेत शिक्षण घेतात, बनताबाई या त्यांचं उत्तम उदारण आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात नायगाव येथील राहणाऱ्या बनताबाई पुताजी काजळे-चोपडे यांचे वय सध्या 58 वर्षे आहे, त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून सध्या काम करत आहेत. बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 17 नंबरचा फॉर्मही भरला. दररोज सर्व कामे करून त्यांनी वर्षभर आपला अभ्यालस सुरु ठेवला.
काही शिक्षकांचीही त्यांना यात मदत झाली, तर कुटुंबातील सदस्यांनीही मार्गदर्शन आणि पाठींबा दिला. घरातील काम करत, अंगणवाडी मदतनीस म्हणून जबाबदाऱ्या पूर्ण करत बनताबाई यांनी बारावीची परीक्षा दिली, आणि पूर्णवेळ अभ्यास करूनही एखाद्या विद्यार्थ्याला गुण मिळणार नाहीत, असे 48 टक्के गुण मिळवून त्या पास झाल्या.
शिक्षणाला वयाची अट नसते आणि इच्छा असेल तर सर्वकाही शक्य असते, हेच बनताबाई यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून देत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कामगिरीनंतर सध्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. ( Passed the HSC 12th examination at age of 58 Banatabai Kajle-Chopde from Maval Taluka )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव शहराच्या कचरा डेपो परिसरात तरूणाची आत्म’हत्या, झाडाला शर्ट… । Talegaon Dabhade Crime
– बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या
– बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई, तळेगाव दाभाडे पोलिसांची दबंग कामगिरी । Talegaon Dabhade Police