मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रमुख पवना धरणाबाबत ( Pavana Dam ) महत्वाची माहिती समोर येत आहे. पवनमावळमधील ( Pavan Maval ) पवना धरण परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सातत्याने होत आहे. पवना धरण हे काही दिवसांपूर्वीच शंभर टक्के भरले ( Pavana Dam 100 Percent Full ) असल्याने आता पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ( Water Will Be Released ) करण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उपअभियंता अशोक शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पवना धरणाच्या सांडव्याद्वारे शुक्रवारी (16 सप्टेंबर) सकाळी 8 वाजता 2100 क्युसेक आणि विद्युत केंद्राद्वारे 1400 असा एकुण 3500 क्युसेक ( Cusecs ) विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी ( Pavana River ) काठच्या गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ( Pavana Dam 100 Percent Full 3500 Cusecs Water Will Be Released From Tam Today )
अधिक माहिती –
Video : पुण्याजवळील या गावात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशत
मावळ तालुक्यात होणारा प्रकल्प गुजरातला गेला; राज ठाकरे भडकले, म्हणाले ‘उलटा प्रवास सुरु’