पवनानगर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पवनानगर केंद्राचा ९१ टक्के निकाल लागला आहे. यात पवना ज्युनिअर कॉलेज मधील उज्वला तुकाराम निंबळे ८२.८३ टक्के गुण घेऊन प्रथम आली तर श्री.छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कान्हे येथील काटकर अमृता गोरख हिने ८२.३३ टक्के आणि शिवणे कॉलेज मधील खेंगरे सुहानी भाऊसाहेब ८१.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवनानगर येथे बारावीचे केंद्र असून येथे परिसरातील पाच कॉलेजमधील ३७२ परीक्षार्थींने परीक्षा दिली होती. मागील शैक्षणिक वर्षापासून संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून सायन्स कॉलेज सुरू करण्यात आले आहे. यावर्षीही विज्ञान शाखेने निकालची परंपरा कायम ठेवली आहे, यामुळे परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. ( pavananagar Centre 12th result announced Ujwala Nimble came first position )
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी कॉलेजच्या प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर तसेच कार्लाचे प्राचार्य कैलास पारधी, कान्हेचे प्राचार्य पांडुरंग ठाकर, कोथुर्णेचे प्राचार्य राहूल कराळे, शिवणे प्राचार्य योगेश घोडके व सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
हेही वाचा – मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 90.55 टक्के, कोणत्या महाविद्यालयाचा किती टक्के निकाल? वाचा सविस्तर
कॉलेजनिहाय निकाल व टक्केवारी पुढीलप्रमाणे :
लायन्स शांता माणेक पवना ज्युनिअर कॉलेज पवनानगर – ९४.२८ टक्के
वाणिज्य विभाग – ९६.५५ टक्के
उज्वला तुकाराम निंबळे – ८२.८३ टक्के
धनश्री उत्तम येवले – ७२.५० टक्के
भारती शंकर कडू-७१.१७ टक्के
विज्ञान विभाग- ९७.८२ टक्के
१) अतुल शंकर ठाकर -६१.६७ टक्के
२) अक्षदा अंकुश कालेकर – ५८.५० टक्के
३) आयेशा इलाहिबक्ष मुजावर- ५७.५० टक्के
कला विभाग- ८६.११ टक्के
१) संध्या अंकुश मोदघंटे- ६९.५० टक्के
२) माधवी मनोज तुपे – ६८.५० टक्के
३) मोहन दत्तात्रय सणस – ६६ टक्के
श्री.छत्रपती शिवाजी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कान्हे- ८८.३७ टक्के
१)अमृता गोरख काटकर- ८२.३३ टक्के
२) सायली छबू भानुसघरे- ८०.८३ टक्के
३) भूषण भरत कुटे- ७६.६६ टक्के
श्री.एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज, कार्ला – १०० टक्के
१)स्नेहल पांडुरंग धोत्रे – ७५.६७ टक्के
२)साक्षी बाळू येवले – ७४.५० टक्के
३)सानिका शंकर जावळे – ७३.३३ टक्के
स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज,शिवणे ८० टक्के
१)सुहानी भाऊसाहेब खेंगरे-८१.१७ टक्के
२) समीक्षा गायकवाड – ६७.३३ टक्के
३) सायली गायकवाड – ६४ टक्के
कै.श्रीमती सरउबआई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेज, कोथुर्णे -९०.९० टक्के
वाणिज्य विभाग- १०० टक्के
१) ज्ञानेश्वरी मारुती खैरे – ७२.८३ टक्के
२) अपर्णा दिलीप दळवी- ७१ टक्के
३)राहुल छबु घारे -७०.५० टक्के
कला विभाग- ७९.८० टक्के
१)कशिष हसन शेख – ७०.८३ टक्के
२) मयुरी शिवाजी दळवी – ७० टक्के
३) दिपाली पंढरीनाथ सावंत – ५८.३३ टक्के
अधिक वाचा –
– शाब्बास..! राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी, एका क्लिकवर चेक करा तुमचा निकाल
– तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल बारावीचा निकाल, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2023