व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बारावीचा निकाल चेक करण्यासाठी लिंक, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार, दिनांक 21 मे) जाहीर करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 21, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Result-via-SMS-on-Mobile

Photo - Dainik Maval Graphics Team


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार, दिनांक 21 मे) जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्याचा निकाल हा 93.37 टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, तर विभागांमध्ये पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे. परंतू ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही अशा विद्यार्थ्यांनाही त्यांचा निकाल ऑफलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ( Maharashtra Board 12th Result Declared )

इंटरनेट नसेल तर असा चेक करा निकाल; ( How To Check HSC Result 2023 via SMS on Mobile )
ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ते विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून त्यांचा निकाल चेक करु शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
– तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे.
– त्याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करुन त्यापुढे रोल नंबर टाइप करावा लागेल.
– हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
– त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024

जर इंटरनेट असेल तर खालीलपद्धतीने चेक करा तुमचा निकाल –
बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असा चेक करा तुमचा निकाल ;
स्टेप 1) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप 2) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

बारावीच्या परीक्षेला किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14,33,371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 95.44 % असून मुलांचा निकाल 91.60 % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 % ने जास्त आहे.

अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake
– अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval
– महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024

Next Post

मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.73 टक्के, ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SSC-HSC-Exam-Result

मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.73 टक्के, ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.