Dainik Maval News : कामशेत येथील लब्धी छाजेड हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत मे २०२५ मध्ये घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशासह लब्धी हिने पवन मावळ परिसरातून पहिली महिला सनदी लेखापाल होण्याचा मान पटकावला आहे. या उज्वल यशाबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- लब्धीचे प्राथमिक शिक्षण लोणावळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. पुढे तिने पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. इयत्ता बारावीनंतर तिने सीए परीक्षेची तयारी सुरू केली होती. फाउंडेशन कोर्समध्ये २५६ गुणांनी यश मिळविले. इंटरमिजिएटच्या ग्रुप १ मध्ये २३८ आणि ग्रुप २ मध्ये ३१२ गुण मिळवत तिने पुढील टप्पा पार केला. अंतिम परीक्षेत तिने ग्रुप १ मध्ये १५९ आणि ग्रुप २ मध्ये १५८ असे एकूण ३१७ गुण मिळवत उज्वल यश मिळविले.
सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळविण्यासाठी लब्धीने दररोज आठ तास अभ्यास केला. सोबत तिच्या या यशात तिची आई विमल, वडील जगदीश तसेच संपूर्ण छाजेड परिवाराचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळाल्याबद्दल डॉ. नयना राठोड, डॉ. नितीन राठोड यांसह विविध मान्यवरांनी लब्धीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.
मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही पवनानगर येथून कामशेतला स्थलांतरित झालो. लब्धीने सनदी लेखापाल व्हावे, हे स्वप्न होते. तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न वास्तवात आणले, याचा आम्हाला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया लब्धीचे वडील जगदीश छाजेड यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे