Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण आजमितीस (दि. 5 ऑगस्ट ) 94.17 टक्के इतके भरले आहे. पवन मावळ सह संपूर्ण मावळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पवना धरण क्षेत्रातही पाऊस जवळपास बंद झाल्याचे दिसत आहे. धरण क्षेत्रातील पाऊस ओसरल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पुर्णतः बंद केला आहे.
मंगळवार, दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 94.17 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 रोजी धरणात 92.81 ठक्के इतका पाणीसाठा होता. पवना धरण 94 टक्के भरले असल्याने मावळमधील अनेक गावे, वाडी वस्तींसह पिंपरी-चिंचवड शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे.
या वर्षी मे महिन्याच्या मध्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला, तर संपूर्ण जून महिना आणि जुलै महिन्यातही जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे पवना धऱण लवकर भरले. तर गतवर्षी उशीरा पाऊस सुरू झाला होता. परंतु गेल्यावर्षी जुलै महिन्यात सर्वात जोरात पाऊस झाला होता. त्यामुळे आजच्या तारखेला धरणात जवळपास समान पाणीसाठा असलेला दिसतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या