मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जनसामन्यांतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गुरुवारी (दि. 9 मे) संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ वडगाव मावळ शहरात महाविकासआघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पायी मशाल रॅलीचे आयोजन केले होते. सायंकाळी 7 वाजता सुरु झालेल्या रॅलीला सामन्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पंचायत समिती चौक येथून पायी मशाल रॅली सुरु झाली. बाजारपेठेतून पोटोबा महाराज मंदिर आणि तिथून खंडोबा चौक अशी ही मशाल रॅली काढण्यात आली. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि सहयोगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
कामशेत येथे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यया प्रचारासाठी अजित पवार यांची सभा असूनही वडगाव शहरातील रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला, हे विशेष. ( payi mashal rally for Sanjog Waghere patil from Mahavikas Aghadi in Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा । Pune News
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !
– मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha