Dainik Maval News : पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात सोमवारी (दि.24) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्थानिक पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या शांतता समितीच्या या बैठकीत विविध जाती-धर्मांचे प्रतिनिधी, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले होते.
मागील आठवड्यात सोशल मीडियावर झालेल्या एका वादग्रस्त पोस्टनंतर शहरातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणारी आणि औरंगजेबाचे गुणगान करणारी पोस्ट केली होती, ज्यामुळे स्थानिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
- बैठकीत सहभागी झालेल्या विविध पक्षांच्या तसेच धर्माच्या नेत्यांनी शहरातील शांतता राखण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला काँग्रेस नेते निखिल कवीश्वर, भाजपाचे देविदास कडू, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नासिरभाई शेख, शिवसेना शिंदे गटाचे संजय भोईर, आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांच्यासह अनेक प्रमुख नेते व नागरिक उपस्थित होते.
सर्व धर्मांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेल्या आदराची भावना व्यक्त केली. “आम्ही वेगवेगळ्या समाजांचे असलो तरी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलो आहोत आणि शिवरायांचे मावळे आहोत,” असे एकमताने सांगण्यात आले. तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातील सण-उत्सव सर्व समाज एकत्र येऊन साजरे करण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान