गर्दीचा आणि ट्राफिकचा चौक बनलेल्या सोमाटणे फाटा येथील चौकात दिनांक 9 मार्च रोजी झालेल्या अपघातातील पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. एका बस चालकाने निष्काळजीपणे बस चालवल्याने सदर पादचाऱ्याला ठोकर बसली होती, अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दिनांक 09 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता जुना मुंबई पुणे हायवेवर सोमाटणे फाटा इथे हा अपघात झाला होता. याप्रकरणी फिर्यादी श्यामनाथ हरिगेन जैस्वार (वय 56 वर्ष, व्या. नोकरी रा. महात्मा फुले नगर एमआयडीसी रोड निअर वायसीएम हॉस्पिटल भोसरी पुणे; मुळ रा. जियासडल पो स्टे बच्छवल ता. मेहनगर जि. आसामगड राज्य उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. ( Pedestrian Citizen Dies After Hitting By Bus At Somatane Phata Near Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आरोपी शैलेश शहाजी भोसले (वय 32 वर्ष रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 279, 337, 338, 304(अ), मो.वा.का. कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 10 मार्च रोजी दाखल फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याच्या ताब्यातील बस क्रमांक (एम.एच. 14 एच.यू. 5372) ही पुणे बाजूकडुन जुना मुंबई-पुणे हायवे मार्गावर चालवित घेवून जात असताना मुंबई लेनवर सोमाटणे फाटा बाजूकडे जाणाऱ्या रोडवर घेवून जात असताना चालकाने ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगयीने निष्काळजीपणे रस्त्याने चालणारा पादचारी फिर्यादी यांचा भाऊ असलेल्या लालमणि जयस्वाल यास जोराची धडक दिली आणि अपघात करून अपघातात फिर्यादीच्या भावाला किरकोळ व गंभीर जखमी करून त्याचे मृत्युस कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत नमुद आहे. सदर प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नसून तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे मपोउपनि धापटे हे या प्रकरणाचा तपास करत आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक! ठाकरवस्तीतील गणपती मंदिरात मोठी चोरी, परिसरात संतापाचे वातावरण । Talegaon Dabhade