तळेगाव दाभाडे शहराजवळील ठाकरवस्ती येथील आकार फाउंड्री कंपनीजवळील गुलाब शेलार यांच्या घराशेजारी असलेल्या गणपती मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. दिनांक 09 मार्च 2023 रोजी रात्री साडेदहा ते दिनांक 10 मार्च 2023 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फिर्यादी संजय वासुदेव ओक (वय 60 वर्षे, पुजारी गणपती मंदीर, ठाकरवस्ती, ता. मावळ, जि. पुणे ) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी फिर्याद दिली होती. ( Theft In Ganapati Temple Near Talegaon Dabhade City Case Registered In Police Station )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदीराच्या लोखंडी ग्रील असलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप उघडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील लाकडी पेटीतील लोकांनी दान केलेले 25 हजार रुपये रोख रक्कम फिर्यादी पुजारी यांच्या कपड्यांमध्ये ठेवलेले 12,700 रुपये रोख रक्कम, 10 हजार रुपये किंमतीचा चांदीचा मोदक आणि फिर्यादी यांचा 5 हजार रुपयांचा मोबाईल फोन, असा एकूण 52,700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस चौकीचे सपोफी कदम हे पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळात क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटलांची मैदानावर जोरदार फटकेबाजी – पाहा व्हिडिओ
– चांदखेड इथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप