तळेगाव दाभाडे : लहान मुलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांमधील कर्करोगाचे पटकन निदान आणि उपचार व्हावेत या उद्देशाने तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर ने रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीन ,रोटरी क्लब ऑफ पर्वती , रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगाने पिडीत लहान मुलांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पेडियट्रिक ऑन्कोलॉजी विभाग सुरू केला आहे. याव्यतिरिक्त ब्लड स्टोरेज सेंटर ही सुरू करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल परमार तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे आणि टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष श्री उदय देशमुख यांच्या हस्ते या दोन्ही नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले आहे. ( Pediatric Cancer Department and Blood Storage Center opened at TGH Onco Life Cancer Center Talegaon Dabhade )
प्रौढ लोकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या केवळ तीन ते चार टक्के आहे. बालपणातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात जास्त आहे. जागरुकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी, आवाक्याबाहेरचा खर्च व अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. या उद्देशाने लहान मुलांच्या कर्करोगावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी बाल ककरोग विभाग सुरू करण्यात आला आहे.
मुलांमध्ये प्रामुख्याने रक्ताचा कर्करोग ( ल्युकेमिया) आढलतो. एक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियासह इतर अनेक प्रकार आढलतात. याशिवाय, मुलांमध्ये लिम्फोमा कर्करोग देखील बऱ्याच प्रमाणत आढळतो, ज्यामधे घशात आणि पोटात गाठी होतात . मुलांना हाडांचा कर्करोग, मूत्रपिंड आणि डोळ्यांचा कर्करोग देखील आढलटो, बहुतेक बाल कर्क रुग्ण , बरे देखील होतात. मात्र, कॅन्सरची लक्षणे वेळीच ओळखली नाहीत, तर ते प्राणघातकही ठरू शकते. प्रौढांपेक्षा बालकांच्या कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात, मात्र केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेळीच निदान झाल्यास लहान मुलांमधील कर्करोग बरा होऊ शकतो.ह्यावेळी प्रेसिडेंट रोटरी क्लब पुणे अमोल फडके, सेक्रेटरी रोटरी क्लब तळेगाव कमलेश कारले, प्रोजेक्ट चेयरमन सुदिन आपटे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वाकड, भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडी सुटणार; ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची होणार निर्मिती
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा