Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्याचा चांगल्या प्रकारात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे. त्याच सोबत आपल्या भात पिकाला सुरक्षा कवच असावे, असे सर्व शेतकऱ्यांना वाटते आणि ते गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभाग व पीक विमा कंपनी यांच्या द्वारे प्रचार प्रसिद्धीचे काम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येळसे येथे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा पाठशाळा शेतकऱ्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवारी (दि. 18 जुलै) झालेल्या या कार्यक्रमाला एच.डी.एफ.सी. एर्गो अधिकारी राष्ट्रीय प्रमुख आझाद मिश्रा, सुभाषित गावित क्लेम हेड, योगेश परिहार राज्यप्रमुख, दत्तात्रय जगताप जिल्हा व्यवसथापक, पंकज साखरे उपव्यवस्थापक,विजय घोरपडे जिल्हा कोऑरडीनेटर, तुषार जगताप तालुका पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे कृषी सहायक विकास गोसावी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनोहर चांदगुडे, सी. एस. सी केंद्र संचालक तानाजी आडकर व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Peek Vima Pathshala under Pradhan Mantri Pik Bima Yojana in Yelse Village Maval )
पीक विमा कंपनीचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पीक विमा कसा भरावा, पीक विमा, फार्मर अँप मध्ये माहिती कशी भरावी याबाबत डेमो द्वारे माहिती दिली. कृषीसहायक विकास गोसावी व पीक विमा प्रतिनिधी तुषार जगताप यांनी नुकसान झाल्यावर करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पीक विमा कंपनी व येळसे ग्रामपंचायतीने केले. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला.
अधिक वाचा –
– मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर
– ‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके
– अनियमित वीजपुरवठ्यामुळे आंदर मावळातील नागरिकांचे हाल, आमदार शेळकेंनी घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सुचना