मावळ तालुक्यातील कान्हे गावाच्या हद्दीत साई सेवाधाम समोर आज गुरुवार (दिनांक 6 जुलै) रोजी रस्ते अपघात झाल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. पहाटे पाऊणे पाच पूर्वी झालेल्या या अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दिनांक 06 जुलै 2023) रोजी पहाटे पाउणे पाच वाजण्यापूर्वी मौजे कान्हे गाव (ता. मावळ जि.पुणे) गावच्या हद्दीत जुना मुंबई-पुणे हायवे रोडवर साईसेवाधाम समोर मुंबईहून पुणेकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. ( person died in road accident at Kanhe Village Maval Taluka on Old Mumbai Pune Highway )
अज्ञात वाहनाच्या अपघातात एक अनोळखी पुरूष (वय अंदाजे 40 ते 45 वर्ष) याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फिर्यादीत नमूद माहितीनुसार श्रीकांत घोडमोरे यांनी याबाबत पोलिसांनी खबर दिली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार काळे (ब.नं. 55) करत आहेत.
अधिक वाचा –
– स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, 13 तालुक्यात 241 दुकानांसाठी जाहीरनामा
– ‘त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही..शरद पवार हेच खणखणीत नाणं..जे गेलेत त्यांची चिंता करु नका..’, वाचा शरद पवारांचे संपूर्ण भाषण