काही महिन्यांपूर्वी मावळ तालुक्यातील कोथुर्णे बला’कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ माजवणारे बला’त्कार प्रकरण मावळ तालुक्यात घडले आहे. जत्रेत नेण्याचे आमिष दाखवून नात्यातील चिमुरडीवर बला’त्कार करणाऱ्या एका नराधमाला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. ( Physically Abuse Minor Girl Accused Arrested By Vadgaon Maval Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रूक येथे मंगळवार (दिनांक 6 डिसेंबर) रोजी ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. त्याला वडगाव न्यायालयाने 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत्रेला नेण्याचे आमिष दाखवून आरोपीने 12 वर्षांच्या अल्पवयीन नातलग मुलीला दुचाकीवर बसवून टाकवे गावाजवळ नेले, तिथे तिच्यावर लैंगिक अत्या’चार केले. तसेच, ही बाब कुणालाही सांगितल्यास मुलीला आणि तिच्या आईला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असता, हा गुन्हा उघडकीस आला. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष जाधव पुढील तपास करत आहेत. ( Physically Abuse Minor Girl Accused Arrested By Vadgaon Maval Police )
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! द्रुतगतीमार्गावर अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी आले ‘देवदूत’
– खळबळजनक! मावळ तालुक्यात महिला सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक