मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शहरातील शिळफाटा येथे असलेल्या इंदिरा गांधी चौकातल्या पातळगंगा नदीच्या ब्रिजच्या कठड्याला धडकून टेम्पो क्र. एम एच 04 एच डी 8303 मधे चालक आस्वान मुस्तुफा – 30, रा. जम्मू काश्मीर हा गंभीर रित्या जखमी होऊन अडकून पडला होता. ही घटना दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 2.50 वा. च्या दरम्यान घडली होती. ( Vehicle Accident on Mumbai Pune Expressway Driver life Saved By Devdoot )
खोपोली पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंगचे कर्मचारी, महामार्गावरील देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी कसोशीने प्रयत्न करून चालक आस्वान मुस्तफा याला बाहेर काढून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ पाठवले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चालक आस्वान मुस्तुफा हा पुण्याकडून मुंबईच्या दिशेने टेम्पो क्र. एम एच 04 एच डी 8303 घेऊन निघाला होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली एक्झिटने घाट उतरत असताना तीव्र उतारावर टेम्पोचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे त्याचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने इंदिरा गांधी चौकात असलेल्या पाताळगंगा नदीच्या ब्रिजवर असलेल्या सुरक्षा कठड्याला तोडत त्या ठिकाणी असलेल्या मोठ्या वृक्षाला धडकून थांबला.
टेम्पोच्या केबिनच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. केबिनमध्ये आस्वान मुस्तुफा हा अडकून पडला होता. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य त्या ठिकाणी पोचल्यानंतर खोपोली पोलीस स्टेशन आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील देवदूत यंत्रणेच्या टीमला त्या ठिकाणी पाचारण केले गेले. क्रेन, हायड्रोलिक कटर तसेच अन्य साधने वापरून चालक आस्वान मुस्तुफाला बाहेर काढण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. अपघातग्रस्त टेम्पो बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
अधिक वाचा –
– खळबळजनक! मावळ तालुक्यात महिला सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक
– महाराष्ट्र पोलिस भरतीबाबत मोठी बातमी! आता तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत स्थान मिळणार?