पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या प्रेरणा जीवन कट्टे यांच्या बदलीचे सुधारित आदेश आले आहेत. पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीच्या प्रमुख अधिकारी म्हणून एसीपी प्रेरणा कट्टे कार्य करत होत्या, त्यांची आता पोलिस प्रशिक्षक केंद्र खंडाळा इथे पोलिस उप अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक / सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत सोमवार (दिनांक 22 मे) रोजी बदली आदेश काढण्यात आले होते, ज्यात प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूर इथे बदली करण्यात आली होती. मात्र बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आले आणि प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द केली गेली. मात्र आज (मंगळवार, दिनांक 30 मे) रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या आदेश पत्रात प्रेरणा कट्टे यांची खंडाळा येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात उप अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध
– पवना धरणातील जलसाठ्यात मोठी घट! पावसाने दडी मारल्यास पाणीकपातीचे संकट, पाहा सध्याचा पाणी साठा