Dainik Maval News : मालमत्ता विरोधी पथकाने मावळ तालुक्यात शिरगाव जवळ एक मोठी कारवाई करीत कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त केले आहे. यासह एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ही कारवाई करण्यात आली. ( Red sandalwood Seized On Mumbai Pune Expressway )
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले 10 ते 15 टन वजनी चंदन पकडले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मालमत्ता विरोधी पथकाने तात्काळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला.
संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला वाहनचालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनर उघडून पाहताच मोठ्या प्रमाणावर चंदन लपवून ठेवलेले आढळले.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. या चंदनाची तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारात करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकासह संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून हे चंदन बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईला पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे. या तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे