Dainik Maval News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने नियोजन आणि सोहळ्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणे, नगरपंचायतीची रुग्णवाहिका सेवाभावी संस्थेला अनामत रकमेद्वारे देणे, पथविक्रेत्यांकडून दैनंदिन व्यवसायिक कर आकारणे, प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीच्या विषयांवर देहू नगरपंचायत कार्यालयामध्ये निर्णय घेण्यात आला.
देहू नगरपंचायत सभागृहामध्ये नगराध्यक्ष पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.24) झालेल्या विशेष सभेत चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम, संघपाल गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, रामदास भागे, नगरसेवक – नगरसेविका आदी उपस्थित होते.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा तीन आठवड्यांवर (दि.16 मार्च) येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने भाविकांच्या सोयी सुविधा आणि मुख्य प्रवेशद्वाराला सोहळ्यापूर्वी रंगोटी करण्याची चर्चा करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नगरपंचायतीने हस्तांतरित केलेली रुग्णवाहिका वाहन जिल्हा परिषदेच्या नावे अभावी पडून आहे. ती रुग्णवाहिका नगरपंचायतीच्या ताब्यात घेऊन परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी सेवाभावी संस्थेला अनामत रक्कम आकारत ३ वर्षाकरिता करारावर देणे, रस्त्यांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून तसेच खासगी व आठवडे बाजारातील विक्रेत्यांकडून प्रतिदिन व्यावसायिक कर आकारण्याचा आणि लिलावाद्वारे देण्याचा तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी २.०) चे अंमलबजावणी करिता आवश्यक कागदपत्रे व शासकीय निकष तपासून तीनशे ते साडेचारशे स्क्वेअर फुटातील बांधकाम लाभार्थींना अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा