व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या ‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
PM Kisan Samman Nidhi and Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली. त्याला जोड म्हणून राज्य शासनानेही 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली. या दोन्ही योजनांचे मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा झाले आहेत. ( PM Kisan Samman Nidhi Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Money Deposited in Farmers Accounts in Pune )

लाभ घेण्यास पात्र व्यक्ती –
या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी व त्यांचे १८ वर्षाखालील अपत्य) लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र 2 हेक्टरपर्यंत आहे, अशा पात्र शेतकरी कुटुंबियांस 2 हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण 6 हजार रुपये प्रतीवर्षी लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना द्यावयाच्या लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते.

लाभ मिळण्यास अपात्र व्यक्ती –
या योजनेकरीता जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धरण करणारे किंवा केलेले आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, महापौर, जि. प. अध्यक्ष तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारितील कार्यालयातील आणि स्वायत्त संस्थांचे तसेच स्थानिक स्वराज संस्थांमधील नियमित अधिकारी, कर्मचारी, मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती, ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारे निवृत्तीवेतनधारक, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळण्यास अपात्र आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 450 कोटी 50 लाख रुपये जमा –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 34 हजार 51 शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत 1 हजार 450 कोटी 50 लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात 36 हजार 903 शेतकऱ्यांच्या खात्यात 109 कोटी 30 लाख रुपये, बारामती- 51 हजार 27 शेतकरी 173 कोटी 70 लाख, भोर- 24 हजार 970 शेतकरी 77 कोटी, दौंड 42 हजार 606 शेतकरी 146 कोटी 50 लाख, हवेली- 10 हजार 551 शेतकरी 43 कोटी 50 लाख, इंदापूर 54 हजार 32 शेतकरी 163 कोटी, जुन्नर- 52 हजार 586 शेतकरी 173 कोटी 80 लाख, खेड- 44 हजार 545 शेतकरी 148 कोटी 20 लाख, मावळ- 17 हजार 532 शेतकरी 57 कोटी 50 लाख, मुळशी- 13 हजार 147 शेतकरी 56 कोटी 50 लाख, पुरंदर- 31 हजार 942 शेतकरी 97 कोटी 90 लाख, शिरुर- 52 हजार 450 शेतकरी 173 कोटी 40 लाख आणि वेल्हे तालुक्यात 8 हजार 760 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 30 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आले आहेत.

पीएम-किसानला राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची जोड –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्याचा निर्णय 30 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून प्रति वर्ष रक्कम 6 हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये अशा वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यप्रमाणे 2 हजार रुपये जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी करणे, पात्र लाभार्थीना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. संनियंत्रणासाठी ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून 248 कोटी 20 लाख रुपयांचा लाभ –
पुणे जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ई-केवायसी, आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून आज रोजी एकूण 4 लाख 39 हजार 653 शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून एकूण 248 कोटी 20 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

“शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता केंद्रशासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्यावतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.” – संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अधिक वाचा –
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

– खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ! पराभूत उमेदवाराकडून न्यायालयात याचिका दाखल, पुन्हा एकदा… । Maval Lok Sabha MP Shrirang Barne
– तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक


Previous Post

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ

Next Post

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी 'हे' काम नक्की करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.