पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा रविवारी 101 वा भाग प्रसारित झाला. पंतप्रधान मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. रविवारी (दिनांक 28 मे) मावळ तालुक्यातील कान्हे गावात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाजपा सांकृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सिनेअभिनेत्री सांकृतीक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत कान्हे इथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते. ‘मन की बात’ कार्यक्रम संपल्यानंतर महाराष्ट्रातील 3 सुप्रसिद्ध महिला संबळ वादकांपैकी एक असलेल्या गौरीताई वनारसे यांनी संबळ वादन केले. ( PM Modi 101th Mann Ki Baat program held at Kanhe village in presence of BJP leader actress Priya Berde )
यावेळी भाजपा सांकृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश वतीने प्रदेश संघटकपदी वेदांत महाजन यांची निवड करण्यात आली. तसेच इतरही काही निवडी करण्यात आल्या. यावेळी निर्माते अमर गवळी, अभिनेत्री तथा संपर्क प्रमुख महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ विद्या पोकळे-पाटील, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक चेतन चावडा, नृत्य दिग्दर्शक भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष जतिन पांडे, भाजपा नेते राजेंद्र सातकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, बुथ अध्यक्ष संतोष सातकर, कामशेत शहर अध्यक्ष प्रविण शिंदे, अशोक सातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News