Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणविरुद्ध मोहीम यशस्वी पूर्ण होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी 17 ते 30 मार्चदरम्यान करण्यात आली आहे.
वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमिनदोस्त करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एमएसईबी आदी विभागांमार्फत 3 ते 13 मार्चपर्यंत 2500 पेक्षा अधिक अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला आहे.
- अनेक स्थानिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. या अतिक्रमणविरुद्धच्या मोहिमेचा पहिला टप्पा संपत आला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात पुणे शहराच्या महामार्गासह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणावर विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून 17 ते 30 मार्चदरम्यान संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहे.
पुढील टप्यामध्ये संयुक्त कारवाई ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे महामार्ग व रस्त्यांवर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई 17 ते 30 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापुलिका हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावेत, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
महामार्गाचे नाव – कारवाईची तारीख
नवलाख उंब्रे ते चाकण – दि. 17 ते 30 मार्च
हिंजवडी परिसर, माण – दि. 17 ते 30 मार्च
तळेगाव-चाकण-शिक्रापूर – दि. 17 ते 30 मार्च
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग