Dainik Maval News : पीएमपीएमएलने भोसरी ते महाळुंगे एमआयडीसी या बस मार्गाचा विस्तार करत पिंपरी ते महाळुंगे एमआयडीसी, एन्ड्युरन्स कंपनी असा नवा बसमार्ग सुरू केला आहे. मंगळवारपासून (दि. १८) प्रायोगिक तत्वावर या मार्गावर बससेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती पीएमपीएमएल कडून देण्यात आली.
पीएमपीएमएलच्या पिंपरी डेपोअंतर्गत भोसरी ते म्हाळुंगे एमआयडीसी (मार्ग क्र. 120) या बससेवेचा विस्तार करण्यात आला आहे. दर अर्धा तासानंतर ही बस मार्गावर सोडली जाणार आहे. पहाटे सव्वा पाच वाजता पहिली बस पिंपरी रोडवरून सुटणार आहे. तर, शेवटची बस रात्री पावणे दहा वाजता सुटेल.
पिंपरी रोड, नेहरूनगर, लांडेवाडी, भोसरी, गंधर्वनगर, मोशी, चाकण तळेगाव चौक, ल्युमॅक्स कंपनी, महाळुंगे फाटा चौकमार्गे ही बस एनड्युरन्स कंपनी, महाळुंगे येथे पोहोचेल. या बस प्रवासाकरिता 12 वर्षापुढील प्रवाशाला 35 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग