Dainik Maval News : व्यवसाय करताना सातत्य आणि चिकाटी असेल तर तो हमखास यशस्वी होतो, असे मत गोल्डन प्रिंट हाऊस पुणेच्या अश्विनी सोनगावकर यांनी व्यक्त केले. त्या रूट सेट संस्था आयोजित ‘मशरूम लागवड’ या दहा दिवसीय मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाला गोल्डन प्रिंट हाऊस पुणेचे प्रवीण सोनगावकर, रूट सेटचे संचालक प्रवीण बनकर, प्रशिक्षक हरीश बाव चे आणि प्रशिक्षिका मनीषा गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक प्रवीण बनकर यांनी संस्थेच्या कार्याबाबत आणि व्यवसायासाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी गोल्डन ग्राफिक्सचे प्रवीण सांगोलकर यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव सांगताना असे प्रतिपादन केले की, कोणताही व्यवसाय करताना उत्पादन आणि गुणवत्ता याकडे लक्ष दिल्यास व्यवसाय यशस्वी होतो. कोणत्याही व्यवसायात शॉर्टकट नसतो, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर व्यवसाय केला तर तो आर्थिक स्थैर्य आणि यश देते.
प्रशिक्षण शिबिरासाठी पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि सूत्रसंचालन प्रशिक्षक हरीश बाव चे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग