Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यक्षम महिलांना यात संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीवर मावळचा दबदबा पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद , वर्षाताई डहाळे, सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाचे संघटन हिच खरी शक्ती असून ती अधिक सक्षम, सशक्त आणि जनाभिमुख करण्याच्या दृष्टीने जिल्हा कार्यकारिणी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे यांनी सांगितले.
मावळच्या १० महिलांना जिल्ह्यात संधी
महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी मावळच्या माजी तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांच्याकडे असून कार्यकारिणीमध्ये मावळ तालुक्यातील बॉबी डिंगा, सुमित्रा जाधव, मृदुला भावे, चारुलता कमलवार, कल्याणी ठाकर, अर्चना म्हाळसकर, शोभा परदेशी, रेश्मा पठारे, राणी म्हाळसकर.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्षा : सायली बोत्रे, उपाध्यक्ष: प्रिंयका चौधरी, भाग्यश्री गायकवाड, सुप्रिया गोते, निर्मलाताई केसवड, भाग्यश्री बोरकर, बॉबी डिंगा, जयश्री कोहकडे
सरचिटणीस : रत्ना पिंगळे,सुमित्रा जाधव, स्वप्नजा खामकर, चिटणीस : सुवर्णा खेडकर, मृदुला भावे, वैशाली मटाले, जयश्री देशमाने, चारूलता कमलवार, अर्चना बहिरवाल, अनिता आढारी, सोनाली घोडेकर,
कोषाध्यक्षा : कल्याणीठाकर, कायदा आघाडी प्रमुख : मालिनी शिंदे, निमंत्रीत कार्यकारिणी सदस्य : स्वाती पाचुणकर, दिपाली गव्हाणे, सुनिता कड, ऐश्वर्या पठारे, रत्नमाला सातव, अर्चना म्हाळसकर, शोभा परदेशी, रेश्मा पठारे, राणी वाळके, तृप्ती भरणे, मोनिका कंद, राणी म्हाळसकर, कांचन येळवंडे, साक्षी कुऱ्हाडे, सुनिता तापकीर, सुनिता भुजबळ, पुजा पोटावळे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

