Dainik Maval News : सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पोलिसांकडून अवैध उद्योग धंद्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच मावळ तालुक्यातील पुसाणे गावच्या हद्दीत असणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाइ केली.
सदर कारवाईत पोलिसांनी हातभट्टीच्या दारूसाठी लागणारे कच्चे रसायन असा एकूण 64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाहीसा करण्यात आला. गुरुवारी (दि.7) पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद राजन्ना जंगिलवाड यांनी याप्रकरणी शिरगाव – परंदवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिला आरोपी विरोधात शिरगाव पोलिसांत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे टोलनाक्यावर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी सुरु । Maval News
– त्यांच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मावळात भाजपा पक्ष संपत चाललाय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke
– मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार ; विरोधी उमेदवारावर आरोपांच्या फैरी । Bapu Bhegade