व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून कंपन्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून कंपन्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेऊन संबंधितांवर कारवाई केली जाते. त्यामुळे कंपन्यांना कोणीही त्रास देत असेल तर कंपन्यांनी पुढे येऊन पोलिसांची मदत घ्यावी. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करतील, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.

  • तळेगाव दाभाडे एमआयडीसी हद्दीतील सर्व औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली जेसीबी कंपनीत (दि २६) आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड,वहातुक विभाग पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, महावितरण तळेगाव दाभाडेचे उपअभियंता जयप्रकाश सगरे, जेसीबी इंडियाचे प्रकल्प प्रमुख संकेत विरकर,महावितरण सहाय्यक अभियंता इंदोरी विभागचे प्रशांत पवार, एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता किरण कंक,राजेश धोत्रे, तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव, सामाजिक सुरक्षा सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त चौबे यांनी तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तळेगाव एमआयडीसी मधील कंपन्यांना प्रामुख्याने नवलाख उंबरे, जाधववाडी रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी, नवीन रस्त्याच्या बाबतीत जमीन अधीग्रहण, रस्त्याची दुरवस्था, होणारे अपघात या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वेळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील औद्योगिक तक्रारींचे निवारण करण्याकरीता आयुक्तालयात इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेलची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत औद्योगिक विभागाच्या अडचणी सोडविण्यात येतात. तळेगाव एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्या यांनी चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही बसविण्यात यावे. कंपनीने कामगारांचे होणारे अपघात टाळण्यासाठी कामगारांना हेल्मेट वापरण्याबाबत पुढाकार घ्यावा.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कंपन्यांनी कामाच्या वेळेचे नियोजन करावे. कामगारांच्या सुरक्षेबाबत त्यांना लवकारात लवकर मदत मिळावी, याकरिता त्यांनी ११२ या क्रमांकावर कॉल करावा. कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्याकडे येणारे ट्रक, ट्रेलर हे रोडवर लागणार नाहीत, तसेच त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही, याची दक्षता घेऊन जड वाहनांना कंपनीच्या जागेत पार्किंग उपलब्ध करून द्यावे. सर्व कंपन्यांच्या पाठीशी पोलिस विभाग खंबीरपणे उभा आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, विशेषतः महिलांविषयी काही समस्या उद्भवल्यास, कोणतीही भीती न बाळगता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. अशा सर्व तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल आणि न्याय दिला जाईल. औद्योगिक क्षेत्रातील वातावरण हे भयमुक्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन केले तर वाहतूक उपायुक्त बापू बांगर यांनी आभार मानले. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत जाधव, तळेगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे, तळेगाव औद्योगिक संघटनेचे जगदीश यादव यांनी नियोजन केले होते.

दरम्यान, मागील काही वर्षांपूर्वी जनरल मोटर्स कंपनीचे स्थलांतर झाले. त्या जागी ह्युंदाई कंपनी आली आहे. या कंपनीला बैठक संपल्यावर आयुक्तांनी भेट दिली. कंपनीचे प्लांट हेड शाम सिंग यांच्याकडून कंपनीबाबत सर्व माहिती घेतली. या वेळी कंपनीला सुरक्षेबाबत आयुक्तांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर


Previous Post

Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श

Next Post

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.