Dainik Maval News : मावळ तालुक्यात आणि परिसरात लपून छपून अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. अशात पोलिसांकडून धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली असून याअंतर्गत शनिवारी ( दि. ६ ) एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांना धडा शिकविला आहे.
पहिली कारवाई –
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी सोपान बधाले या ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीवर अवैधरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे., तसेच बीएनएसएस ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. शनिवारी ( दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी नवलाख उंबरे, बधलवाडी येथे कारवाई केली असता वरील आरोपीच्या ताब्यात एकूण दहा हजार रुपये किमतीचा २०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई –
देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील बंगळुरू हायवेलगत असणाऱ्या चर्च जवळील बस स्टॉप समोर आरोपी अनिल जगन्नाथ बोरसे ( वय ४१, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) हा ९,५५० रुपये किंमतीचा १९१ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ कब्जात बाळगताना मिळून आला. आरोपीवर एन. डी. पी. एस अँक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

