व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एका वर्षानंतर वाहनचोरीचा गुन्हा उलगडला, औंढोली गावातून चोरलेला टेम्पो वाघोलीत सापडला, एकाला अटक । Maval News

लोणावळा परिसरातील औंढोली गावातून एक वर्षापूर्वी चोरी गेलेला टेम्पो पोलिसांनी शोधून काढला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 23, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Police have recovered tempo stolen year ago from Aundholi village in Lonavala area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा परिसरातील औंढोली गावातून एक वर्षापूर्वी चोरी गेलेला टेम्पो पोलिसांनी शोधून काढला आहे. अहिल्यानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाघोली बाजारतळ परिसरात लावलेला टेम्पो पोलिसांनी पाहिला असता बऱ्याच दिवसांपासून सदर टेम्पो बाजारतळावर असल्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी माहिती काढल्यावर सदर टेम्पो चोरीचा असून वाहन चोरीचा गुन्हा समोर आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत टेम्पो ताब्यात घेतला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

सुनील अण्णा कांबळे (वय ४०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघोली पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी वाघोली बाजारतळ परिसरात वाहन क्रमांकाची अर्धवट पाटी असलेला टेम्पो पोलीस कर्मचारी प्रदीप मोटे यांनी पाहिला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बागल आणि पथकाने बाजरतळ परिसरात तपास सुरू केला. टेम्पोत असलेल्या कांबळे याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे आणि वाहन क्रमांकाबाबत पोलिसांनी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कांबळेला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले.

चौकशीत त्याने टेम्पो लोणावळा परिसरात असलेल्या औंढोली गावातील एका घरासमोरून एक वर्षापूर्वी चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर वाघोली पोलिसांनी शहानिशा केली. आरोपी कांबळेला अटक करुन टेम्पो जप्त केला. त्याला तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल, प्रदीप मोटे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मनोज भोरडे यांनी ही कामगिरी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime


Previous Post

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

Next Post

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार - आमदार सुनील शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.