व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! लोणावळा जवळील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा शहराजवळील कुणेनामा परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 22, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : लोणावळा शहराजवळील कुणेनामा परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि अलिशान गाड्यांसह एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बंगल्याचा मालक आणि जुगार खेळणाऱ्यांसह एकूण २२ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:४० वाजण्याच्या सुमारास कुणेनामा (ता. मावळ) येथील एका बंगल्यात ही धडक कारवाई करण्यात आली. करण पाटील या इसमाने हा बंगला मालक हनुमंत एकनाथ थोरबोले (रा. आर के. हॉटेल शेजारी, वरसोली टोलनाका, ता. मावळ) याच्याकडून ६० हजार रुपये भाड्याने घेतला होता व तेथे हा बेकायदेशीर जुगाराचा अड्डा चालवला जात होता. पोलीस हवालदार मयुर काळुराम आबनावे यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी छापा टाकला असता सदर बंगल्यात दोन टेबलांवर ‘फ्लॅश’ नावाचा तीन पानी जुगार खेळताना आरोपी रंगेहाथ मिळून आले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य (प्लॅस्टिकचे कॉईन, पत्ते), रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल (Apple, Samsung, Vivo, Oppo इ.) आणि ६ अलिशान गाड्या (Hyundai Venue, Kia Seltos, Maruti Swift, Ford Endeavour, Kia Sonet, Volkswagen) असा एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खालील २२ जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (गु.र.नं. ४९/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे

१) विशाल रामदास काळे (नवी मुंबई) २) अक्षय शंकर शेडगे (नवी मुंबई) ३) अजित राजकुमार पंचवाणी (उल्हासनगर) ४) अक्षय मानसिंग मोहिते (नवी मुंबई) ५) इम्रान सलीम शेख (नवी मुंबई) ६) अकबर शफी हुसेन (मुंबई) ७) जहूर सल्लाउद्दीन अन्सारी (नवी मुंबई ) ८) रंगनाथ कारभारी ओटी (नवी मुंबई) ९) मुकेश सत्यनारायण यादव (मुंबई) १०) बजरंग शामलाल गुप्ता (नवी मुंबई) ११) महादेवन आर के (नवी मुंबई) १२) नावेद जिगर मेमण (मुंब्रा, ठाणे) १३) जितेंद्र उत्तम परदेशी (दिघी, पुणे) १४) रवी बिपीन सोनपाल (नाशिक) १५) रमणलाखन यादव (उलवे, रायगड ) १६) गुरुदेव भीमराव जाधव (मुंबई) १७) हरिओम कुमार रामबिरसिंग (वांद्रे, मुंबई) १८) आकाश भगवती प्रसाद (वांद्रे, मुंबई) १९) रंजना गायसी (पणजी, गोवा) २०) चंदा मगर (पणजी गोवा) २१) मिनुका मोहरजन (पणजी गोवा) २२) हनुमंत एकनाथ थोरबोले (बंगला मालक, वरसोली, ता. मावळ)

अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लोणावळा शहरचे पोलीस अधीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहेत. या कारवाईमुळे लोणावळा व मावळ परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


Previous Post

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

Next Post

तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime

March 22, 2026
Crime

मोठी बातमी ! लोणावळा जवळील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

March 22, 2026
Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.