Dainik Maval News : सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून अवैध उद्योग धंद्यांवर कारवाई सुरू ठेवली आहे. सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनीट ५ ने प्राप्त माहितीच्या आधारे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील आंबी गावाच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर अचानक छापा टाकला.
यावेळी त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे १ लाख १२ हजार रुपये किमतीचे रसायन व मुद्देमाल आढळून आला. तो ताब्यात घेऊन पोलिसांनी नष्ट केला असून एका तीस वर्षीय महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे धनंजय लक्ष्मण भोसले (वय ५२ वर्षे) यांनी तळेगाव एमआयीडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार महिला आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade