Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने मावळ तालुक्यातील पुसाणे गावातील एका दारू भट्टीवर छापा मारला. ही कारवाई रविवारी (दि.9) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी रविवारी (दि.9) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पुसाणे गावात ओढ्यावरील बंधाऱ्याजवळ दारूभट्टी लावली. महिलेने त्यामध्ये गूळ मिश्रित रसायन भिजत घातले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. पोलिसांनी 38 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका