Dainik Maval News : मावळ तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या धंद्यांची मालिका काही संपताना दिसत नाही. पोलिसांकडून वारंवार कारवाया होऊन देखील चोरून लपून अवैध उद्योगधंदे सुरू असलेले दिसतात. नुकतीच शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करीत एक गावठी हातभट्टी दारू निर्मित करणारा अड्डा उध्वस्त केला.
सोमवारी ( दि. 8 ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुसाणे गावच्या हद्दीत ओढ्याचे बाजूला ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई बाबाराजे रामराव मुंडे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४५ वर्षीय महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला पळून गेल्याने अद्याप अटकेत नाही. संबंधित महिला आरोपीवर शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ( क ) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपीने १ लाख रुपये किंमतीचा हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन भिजत घालताना, १७ हजार ५०० रुपये किंमतीची १७५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु आणि २००० रुपयांचा अन्य मुद्देमाल साहित्य जवळ बाळगताना मिळून आली. महिला आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली. पुढील तपास पोलीस हवालदार माने हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले

