Dainik Maval News : विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीत अवैधरित्या दारू विक्री करणे व तयार करणे, तसेच पैशांचा होणारा गैरवापर याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून अवैध उद्योगधंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु ठेवली आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि. १० नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिरगाव गावच्या हद्दीत रोहिदास गोपाळे यांच्या शेताच्या बाजूला पवना नदीचे कडेला छापा टाकला.
त्यावेळी तिथे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे १०,००० लीटर गुळ मिश्रित कच्चे रसायन असा एकूण ३ लाख ५० हजार ५०० रुपये एकूणचा प्रतिबंधित माल बेकादेशीररित्या भिजत घालताना मिळून आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी निलेश ज्ञानेश्वर पवार (वय ३२ वर्षे, रा. शिरगाव, ता. मावळ) हा पळून गेला.
पोलीस हवालदार किशोर विठ्ठल परदेशी यांनी याबाबत शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी निलेश पवार याच्या विरोधात शिरगाव ठाण्यातद महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार घाडगे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade