Dainik Maval News : आंबी येथील गावठी दारूभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 13 हजार 500 रुपयांचे रसायन नष्ट केले. शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासातया सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अंमलदार भमराव बाबा खिलारे यांनी रविवारी (दि.3) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आंबी (ता.मावळ) येथील कंजारभाट वस्तीमध्ये राहणार्या 35 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळेकडून आंबीकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूला गावठी हातभट्टीची तयार दारू 35 लीटर मापाचे प्लॅस्टीकचे दोन काळे रंगाचे कॅन व तीन हजार लिटर कच्चे रसायन असा एकूण 1 लाख 13 हजार 500 रूपयांचा ऐवज मिळून आला.
पोलिसांनी हे रसायन जागेवरच नष्ट केले. परंतु, पोलीस आल्याची चाहूल लागताच तेथील महिला आरोपी झाडाझुडपाचा फायदा घेऊन पळून गेली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक