Dainik Maval News : वडगाव शहरात वाहनांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 15 बुलेट राजांवर वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारी (दि.18) धडक कारवाई केली. यामध्ये 8 बुलेट, 4 यामाहा आणि 3 स्प्लेंडर दुचाकी चालवणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.
वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ रोड, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, रमेश कुमार सहानी स्कूल परिसर, माळीनगर, केशवनगर आदी ठिकाणी बुलेट, स्प्लेंडर, यामाहा या गाड्यांचे सायलेन्सर बदलून त्यांचा कर्णकर्कश आवाज करत जाणारे विद्यार्थी व इतर वाहनचालकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. यात गाड्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.
वाहनांमधील सायलेन्सर बदलून ती जोरात चालवल्याने कर्णकर्कश आवाजाने वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, सहायक निरीक्षक शीतलकुमार डोईजड, हवालदार श्रीशैल कंटोळी, संदीप चौधरी, सचिन देशमुख, चेतन कुंभार, गणेश होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप
– वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे
– वडगाव येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे
– चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू
