Dainik Maval News : पावसाळ्याची सुरूवात होते ना होते तोच, पवन मावळ विभागातील प्राथमिक बाजारपेठ असलेल्या पवनानगर बाजारपेठेतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
दैनिक मावळमध्येही याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच अनेक पक्ष, संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता, त्यावेळी हे खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु, आता महिन्याभरात हे बुजविलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत.
पवनानगर ही परिसरातील अनेक गावांची प्राथमिक बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसभर येथे मोठी वर्दळ असते. तसेच पवनमावळातील पश्चिम पट्ट्यात जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता असल्याने येथे वाहनांची मोठी ये-जा असते. तसेच पर्यटकांची वाहनेही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात.
अशात पश्चिम बाजूकडून बाजारपेठेत येणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो., त्यामुळे वाहतूक कोंडीही होत असते. हे खड्डे बुजविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु मुरुम सदृश्य माती टाकून खड्डे बुजविल्याने ती माती वाहून जाऊन पुन्हा खड्डे उघडले पडले आहेत. यामुळे नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या