Dainik Maval News : आंदर मावळ विभागाला जोडणाऱ्या प्रमुख कान्हे ते टाकवे बुद्रुक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे दिसत आहे. यातही कान्हे चौकातून जाणारा रस्ता सर्वाधिक खराब झाला असून येथे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना या नादुरुस्त रस्त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
- कान्हे जवळील महिंद्रा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात रस्ता खचलेला दिसतोय. या ठिकाणी असलेल्या साइडपट्ट्या ह्या जलपट्ट्या भासाव्यात अशी परिस्थिती आहे. तसेच येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने अनेकदा साईडपट्टी खचून अपघात होतात.
कान्हे रेल्वे गेटच्या परिसरामध्ये देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे तिथेही लहान मोठ्या वाहनांचे छोटे-मोठे अपघात होत असतात. खड्ड्यांमधील साठलेल्या पाण्यातून जाताना दुचाकीस्वारांवर पाणी उडत असल्याने यातून वादविवाद होत असतात. कान्हे येथून टाकवेला जाणारा हा रस्ता आंदर मावळ विभागाला आणि औद्योगिक क्षेत्राला जोडणारा प्रमुख रस्ता आहे, त्यामुळे ह्या रस्त्याची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे.
वारंवार होणाऱ्या अपघातातून सामान्यांच्या जीवास अपाय होत असून एखाद्या निष्पाप जीवाचा जीव जाण्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस सर्वार्थाने सुयोग्य करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा उप अभियंता धनराज दराडे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी, कान्हे ते टाकवे या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम चालू असून जिथले खड्डे भरणे बाकी आहे तिथले खड्डे लवकर भरले जातील, असे सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा