व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे मान्यवर मंडळी एकत्रित सहभागी झाले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 10, 2023
in लोकल, शहर
potoba-maharaj-dindi-maval

Photo Courtesy : Yashwant Shinde


जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान (शनिवार, दिनांक 10 जून) झाले. प्रथमतः वारकरी संप्रदायातील भाविक आणि शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी तसेच नागरिक व महिला भगिनींनी विणापूजन करत सर्वांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे मान्यवर मंडळी एकत्रित सहभागी झाले होते. ( potoba maharaj dindi left towards pandharpur for adhadhi ekadashi yatra 2023 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदुंगमणी, टाळकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले.

हेही वाचा – इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्वाची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कान्हे ग्रामपंचायतीचे कौतूक

श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक, भगिनी, जैन बांधव, पत्रकार बांधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सोसायटीतील मित्रपरिवार, हितचिंतक आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे यांनी स्वागत केले. तर मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी आभार व्यक्त केले.

अधिक वाचा –
– मोदी@9 अभियान : तळेगावात भाजपाचे संयुक्त मोर्चा संमेलन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
– मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या संघटकपदी प्रा गोपीचंद कचरे यांची निवड


Previous Post

चालकाची मस्ती, टेम्पोची घाटात कुस्ती..! हाईट बॅरिकेडमधून टेम्पो घुसवण्याचा आगाऊपणा चालकाला नडला

Next Post

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान । आषाढी वारी 2023

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tukaram-maharaj-palkhi

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान । आषाढी वारी 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.