श्री क्षेत्र देहू नगरीत पंतप्रधान आवास योजना घरकुलांचे वाटप सोमवार (30 जानेवारी) रोजी करण्यात आले. ‘मावळ तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे स्वप्न पाहिले आहे. या घरकुलात राहून मुलाबाळांचे चांगले शिक्षण पूर्ण करावे, हेच आमच्या सर्वांचे उद्धिष्ट आहे. तसेच येणाऱ्या काळात देहू शहरातील जास्तीत जास्त स्वतःचे पक्के घर मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे यावेळी बाळा भेगडे यांनी म्हटले. ( Pradhan Mantri Awas Yojana Houses Distributed In Shri Kshetra Dehugaon Bala Bhegade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या टप्यातील 20 घरकुलांचा कार्यदेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मा बाळासाहेब घोटकुले, शिवसेना शहराध्यक्ष सुनील हगवणे, मा बाळासाहेब काळोखे, मा सरपंच संतोष हगवणे, संतोष चव्हाण, सागर मुसुडगे आदी प्रमुख पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शिळींब गावात मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचे एनएसएस शिबीर संपन्न, निरोप घेताना मुले झाली भावूक
– तळेगाव दाभाडेत ‘आरोग्य संपदा महाशिबीर’, तालुकावासियांनी आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आमदार शेळकेंचे आवाहन