Dainik Maval News : आदिवासी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने मावळ तालुक्यात ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ राबविले जात आहे. मंगळवारी पवनानगर येथे सदर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवनमावळ विभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी अभियानाला लाभ घेतला.
अभियानाअंतर्गत आदिवासी बांधवांना मोफत आधार कार्ड नोंदणी, जातीचे प्रमाणपत्र, जनधन बँक खाते, घरकुल आवास योजना नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान योजना, जॉब कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, वय व अधिवास दाखले तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ घेता आले. तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान संपन्न झाले.
तर, मंडल अधिकारी एम.एस.चोरमले, सूर्यकांत राऊत, योगेश वाघ, क्षीरसागर भाऊसाहेब, कोतवाल रामदास कदम, विठ्ठल पाठारे, सोमनाथ कालेकर, पांडुरंग वावळे, प्रदीप राऊत यांनी अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. अभियानात १०३ आदिवासी नागरिकांनी लाभ घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप
– अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी मावळात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– टाकवे बुद्रुक गावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा ! बैलाच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी तरूणाईत स्पर्धा । Bail Pola 2024