Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शिरगाव येथे संपन्न झालेल्या मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात गादी विभागातून प्रतिक देशमुख, तर विभागातून अजित करवंदे यांची निवड झाली आहे.
तसेच केतन घारे, प्रतिक येवले, नयन गाडे, अभिषेक हिंगे, सतिश मालपोटे, समीर घारे, समीर ननावरे, राज बोडके, हर्षद थोरवे, सुरज म्हाळसकर, संग्राम बोडके, रोहन जगताप, साहिल शेळके, ओम खिलारी, करण कदम, योगेश पवार, अक्षय पिंगळे, चेतन चिमटे, ओम पवार, धिरज शिंदे, शौर्य गोपाळे, स्वराज बोडके, श्रवण बोडके, आदिनाथ हांडे, चैतन्य ठाकर, साई चांदेकर व आर्यन ओव्हाळ यांनी आपआपल्या वजनी गटात विजेतेपद पटकाविले असून सर्व विजेत्यांची कोंढवा बुद्रुक येथे होणाऱ्या जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने साईबाबा कुस्ती संकुल शिरगाव येथे मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या कुस्ती स्पर्धेत 114 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पंच म्हणून बंडू येवले, पप्पू कालेकर, भानुदास घारे, राकेश सोरटे, सुरेश आडकर व समीर शिंदे यांनी काम केले.
कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ ऑलिंपिकवीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारूती आडकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू वाळूंज, कार्याध्यक्ष नागेश राक्षे, खजिनदार मनोज येवले, सचिव बंडू येवले, ॲड पप्पू कालेकर, धोंडिबा आडकर, गजानन राक्षे, उस्मानभाई शेख, नवनाथ बोडके, विश्वास वाघोले, ऋषिनाथ शिंदे, रामभाऊ गोपाळे हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे; मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा-२०२५ – अंतिम निकाल
बालगट: – १४ वर्षाखालील
२५ किलो- प्रथम :- चेतन चिमटे (कुसवली)
द्वितीय:- रुद्र मालपोटे (टाकवे),
२८ किलो- प्रथम:- श्रवण बोडके (गहुंजे)
द्वितीयः- आदर्श ढाले (शिरगाव)
३२ किलो- प्रथम:- ओम पवार (काले)
द्वितीय:- आर्णव सातकर (कान्हे)
३६ किलो- प्रथम:- स्वराज बोडके (गहुंजे)
द्वितीय:- साईराज आंबेकर (उर्से)
४० किलो- प्रथम:- आदिनाथ हांडे (आंबळे)
द्वितीय:- गौरव धामणकर (उर्से)
४४ किलो- प्रथम:- चैतन्य ठाकर (येळसे)
द्वितीय:-यश सावंत (उर्से)
४८ किलो- प्रथम:- साई-चांदेकर (आढले)
द्वितीय:- शार्विल तिकोणे (तळेगाव)
५१ किलो- प्रथम:-धिरज शिंदे (उर्से)
द्वितीय:-प्रतिक असवले (टाकवे)
५५ किलो- प्रथम:- आर्यन ओव्हाळ (जांभूळ)
६० किलो- प्रथम:- शौर्य गोपाळे (शिरगाव)
वरिष्ठ गादी विभाग
५७ किलो- प्रथम:- सतिश मालपोटे (फळणे)
द्वितीय :- तन्मय बरकडे (उर्से)
६१ किलो- प्रथमः- —————————–
६५ किलो- प्रथम:- अभिषेक हिंगे (पिंपळखुंटे)
७० किलो- प्रथम:- प्रतिक येवले (गोडूंब्रे)
द्वितीय :- पृथ्वीराज बोडके (गहुंजे)
७४ किलो- प्रथम-संग्राम बोडके (गहुंजे)
७९ किलो- प्रथमः- केतन घारे (सडवली)
द्वितीयः- श्री शिंदे (टाकवे)
८६ किलो- प्रथम:- हर्षद थोरवे (चांदखेड)
द्वितीय:- पार्थ जांभूळकर (जांभूळ)
९२ किलो- प्रथमः- सुरज म्हाळसकर (वडगाव)
९७ किलो- प्रथमः- राज बोडके (गहुंजे)
८६ ते १२० किलो- प्रथम:- प्रतिक देशमुख (सडवली)
वरिष्ठ माती विभाग
५७ किलो- प्रथमः- समीर ननावरे (टाकवे)
द्वितीय:- मानस दाभाडे (उर्से)
६१ किलो- प्रथम:- रोहन जगताप (कशाळ)
६५ किलो- प्रथमः- साहिल शेळके (शिंदगाव)
७० किलो- प्रथम:- ओम खिलारी (पाचाणे)
द्वितीय:- चिंतामणी पिंपळे (पिंपळोली)
७४ किलो- प्रथमः- करण कदम (नायगाव)
७९ किलो- प्रथम:- समीर घारे (येलघोल)
द्वितीय:- अमोल जगताप (कशाळ)
८६ किलो- प्रथम:- योगेश पवार (चांदखेड)
९२ किलो- प्रथमः- अक्षय पिंगळे (टाकवे)
९७ किलो- प्रथम:- नयन गाडे (कान्हे)
८६ ते १२० किलो- प्रथमः-अजित करवंदे (कल्हाट)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News