आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी दिनांक 28 जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. प्रशासनाकडून पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशात पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आवश्यक इतर महत्वाच्या गोष्टींची देखील पूर्तता केली जात आहे. श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने ज्या पालखी रथात जाते त्या पालखीला, रथाला आणि अन्य वस्तूंना कारागिरांकडून चांदीचा मुलामा चढवण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संत तुकाराम महाराज यांचा यंदा 339 वा आषाढी वारी पालखी सोहळा आहे. त्यानिमित्त पालखी सोहळ्यात असणारी आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूडटक्के, समया, तुकोबांच्या पादुका, संत तुकोबांच्या पादुका, पालखी, पालखी रथ तसेच मुख्य मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महिरप, चौकटी, दरवाजे,अभिषेकाचे व पूजेचे थाळ,चौरंग,पाट व इतर साहित्याला कोल्हापूर हुपरी येथील पपू सद्गुरु दास गोपाळ कृष्ण पायी दिंडीतील वारकरी व कारागिरांच्या मदतीने चकाकी देण्यात आली आहे. ( Preparations for Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony Silver plating of Palkhi and Rath )
अधिक वाचा –
– जागतिक योग दिवस : तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून योगाभ्यास आणि योग प्रात्यक्षिके । International Yoga Day 2024
– वडगाव मावळ शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी, 250 महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप । Vadgaon Maval
– अर्धी लढाई जिंकली ! तळेगाव नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगितीचा आदेश नगरविकास खात्याकडून जारी, आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश